Health

Seed Therapy

Seed Therapy

सुजोक थेरपी, कलर थेरपी, डान्स थेरपी, ऍपीथेरपी, ऍक्युप्रेशर थेरपी आणि योगा थेरपी अशा थेरपीचे उपचार सहसाकरून कुणी स्वत:हून पे्ररित होऊन घेतांना दिसत नाही. प्रचलित थेरपी जशा ऍलोपॅथी, होमिओपॅथी किंवा आयुर्वेदीक अशा पॅथींकडूनसुद्धा जेव्हा दुखणे बरे होत नाही, तेव्हा नाईलाजास्तव रूग्ण अशा वेगळ्या पॅथींकडे वळतो. अशा वेगळ्या पॅथींमध्ये आता आणखी एका पॅथीची भरपडली आहे, ती म्हणजे सीड थेरपी.  ...... read more

सर्दी

सर्दीवर सोपे उपाय

सर्दी-पडशापासून कुणीही सुटलेले नाही. प्रत्येकाला दरवर्षी किमान एकदा तरी सर्दीचा सामना करावा लागतो. खरंतर सर्दी ही विषाणूंमूळे होते. हे विषाणू श्वासावाटे एकापासून दुसऱ्याकडे सहज पसरतात. त्यामुळे नाकाच्या आतल्या आवरणाचा दाह होतो. त्याला सूज येते व त्यातून पाणी वाहते. नाकाचा आतील भाग लाल होऊन सुजल्यामुळे कधीकधी आतली हवेची वाट अरूंद होते आणि त्यामुळे श्वासाचा त्रास व्हायला सुरूवात होऊ शकते.-- Read More

सर्दी टाळण्याचे उपाय- 

काही लोकांना रात्री झोपण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय असते, हे टाळल्यास सर्दी टाळता येऊ शकते. तसेच झाडतांना उडणारी धुळ नाकात गेल्यास किंवा थेट पंख्याखाली उभे राहिल्यास काही लोकांना शिंका येण्यास सुरूवात होते. त्यामुळे त्यांनी घर झाडतांना काही काळ बाहेर जावे किंवा स्वत: झाडायचे असल्यास नाकाला मास्क लावावा, थेट पंख्याखाली न बसता बाजूला बसावे. सतत कुलर किंवा एसीचे गार वारे शरीरावर घेणे, फ्रिजचे पदार्थ , दह्याचे सतत सेवन, दिवसा झोपणे, वाहनांचे-धुपेचे-अगरबत्तीचे धूर नाकात जाणे, फ्रूट सॅलड, आंबवलेले पदार्थ, ब्रेड, लोणचे आदी बाबी या सर्दी होण्यास मदत करतात, म्हणून या टाळल्या तर वांरवार होणारी सर्दी टाळता येऊ शकते.  

उपचार-

 वारंवार होणारी सर्दी टाळण्यासाठी कारल्याची चटणी, बडीशेप, शेवगा, आले, लसूण, पुदिना, उडीद, आवळा इ. बाबी आहारात नित्य असाव्यात. ओल्या हळदीचा रस घ्यावा, तुळशीची पाने खावी, कपाळाला वेखंड-सुंठ लेप लावावा. तेल लावून गरम पाण्याने आंघोळ करावी, पिण्यासाठी गरम पाणी वापरावे. सर्दीवर नागगुटी किंवा त्रिभुवनकिर्ती या औषधांच्या २-२ गोळ्या दिवसातून तीन वेळा याप्रमाणे ३ दिवस घेतल्याने लाभ होतो. जलनेती, नस्यसारख्या उपायांनी सुद्धा सर्दीत उत्तम प्रकारे लाभ होतो.

Folic Acid Tablets

गर्भवीती स्त्रीला आवश्यक - फोलिक ऍसिड

आपल्या मेंदूच्या सर्वसाधारण कार्यपद्धतीच्या व लाल रक्तपेशीच्या वाढींसाठी फोलिक ऍसिड गरज असते. विशेष म्हणजे लोह पचण्यास आणि शरीरातील रक्ताची पातळी कायम ठेवण्यातही फोलिक ऍसिडचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे.फोलिक ऍसिडची सर्वात जास्त गरज गर्भवती स्त्रीला आणि गर्भात असणाऱ्या बाळाला असते. --Read more 

फोलिक ऍसिड हे एक प्रकारचे जीवनसत्त्व असून फोलोसीन आणि फोलेट नावानेही त्याला ओळखले जाते. खरंतर हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व ब-९ चे रूप आहे. नवीन पेशींची जडणघडण आणि वाढ हे फोलिक ऍसिडचे मुख्य कार्य असते. शरीरास हानीकारक ठरणारे विशेषत: ह्दयाला घातक असणारे होमोसिस्टीन हे तत्त्व कमी करण्यासही ते मदत करते. तसेच आपल्या मेंदूच्या सर्वसाधारण कार्यपद्धतीच्या व लाल रक्तपेशीच्या वाढींसाठी त्याची गरज असते. विशेष म्हणजे लोह पचण्यास आणि शरीरातील रक्ताची पातळी कायम ठेवण्यातही फोलिक ऍसिडचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. 

   फोलिक ऍसिडची सर्वात जास्त गरज गर्भवती स्त्रीला आणि गर्भात असणार्‍या बाळाला असते. कारण गरोदर काळात स्त्रीच्या शरीराची फोलिक ऍसिडची गरज दुपटीने वाढलेली असते. याच्या कमतरतेमुळे जन्मापूर्वी बाळाच्या मेंदूत आणि पाठीच्या कण्यात बिघाड होऊ शकतो. गर्भधारणेपासून अडीच ते तीन महिन्यांमध्ये भ्रूणातील अवयव निर्माण होत असतात. म्हणूनच गर्भधारणेपूर्वी व गर्भधारणेनंतर लगेचच तीन महिन्यापर्यंत फोलिक ऍसिड घेतलेच पाहिजे. उर्वरित सहा महिन्यांमध्ये गर्भाचा व्यवस्थित विकास होण्यासाठीही या औषधाची गरज असते. असे केल्याने बाळाला पुढे न्यूरॉलॉजीकल समस्या होण्याची शक्यता कमी होते. स्तनपान करतांना आणि लहानमुलांसाठी सुद्धा फोलिक ऍसिडची गरज अत्यंत महत्त्वाची असते. तसेच मेनोपॉज झालेल्या स्त्रियांच्या ह्दयाच्या आरोग्यासाठी जीवनसत्त्व ब १२सोबत फोलिक ऍसिड फार महत्त्वाचे असते.

कम्प्युटर व्हिजन सिन्ड्रॉम

डोळ्यासंबधी एक समस्या लोकांमध्ये आता आढळू लागली आहे, डोळे कोरडे होणे ही ती समस्या असून विशिष्ट लोकांनाच विशिष्ट काम करतेवेळी या समस्येचा सामना करावा लागतो.--Read More

सतत संगणाकाशी येणार्‍या संपर्कामुळे डोळे कोरडे पडतात. त्यामुळे डोळ्यातून पाणी येते. अशा वेळेस आपल्या पापण्यांची हालचाल करत ठेवावी. दर दोन तासांनी डोळ्यांवर दोन्ही हात ठेवून हलकेच दाब द्यावा व शक्यतो आपल्या डोळ्यांच्या उंचीपासून १५ ते २० से.मी. संगणक खाली ठेवावा. संगणकाच्या सतत वापरामुळे जसा डोळ्यांना त्रास होतो, तसाच त्रास आयपॅड वारणार्‍यांना होऊ शकतो, अशी शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. सकाळी उठल्यापासून  रात्री झोपेपर्यंत सतत आयपॅडच्या स्क्रीनकडे पाहणार्‍यांना डोळ्यांसंबधी विविध तक्रारी उद्भवू   शकतात. या तक्रारींमध्ये डोळे दुखणे, डोकेदुखी, अंधुक दिसणे आणि डोळे कोरडे होणे  यासारखी लक्षणे येतात. डॉक्टरांनी या सर्व लक्षणांना एकत्रितपणे कम्प्युटर व्हिजन सिन्ड्रॉम असे नाव दिले आहे. कम्प्युटर, टॅबलेट आणि स्मार्टफोनच्या स्क्रीनमध्ये पिक्सलेट इमेजेस असल्यामुळे हा त्रास अधिक होतो. सामान्यत: माणूस सेकंदाला पापण्यांची उघड-झाप करत असतो, मात्र जेव्हा स्क्रीन समोर असते, तेव्हा हा कालावधी आपोआपच कमी होतो आणि उघड-झाप उशिरा होऊ लागते, त्यामुळे डोळे कोरडे पडून डोळ्याच्या विविध समस्यांना आमंत्रण मिळते. या समस्या टाळण्यासाठी दर २० मिनिटांनी स्क्रीनपासून दूर जावे आणि किमान २० सेकंद तरी डोळ्यांना विश्रांती द्यावी. तसेच डेस्कटॉप वापरणार्‍यांनी मॉनिटर खांद्याच्या समांतर रेषेवर ठेवावा, फॉण्टसाईज वाढवावी अशा सूचना डॉक्टरांनी केल्या आहेत.

गोगलगायीचे उपयुक्त विष

मृदकाय संघाच्या उदरपाद वर्गात गोगलगायींचा समावेश होतो. गोगलगायीची वैशिष्ट म्हणजे शरीरावर असणारी कवचे. मात्र कवच नसलेल्या किंवा अगदी छोटे कवच असलेले प्राणीही एक विशिष्ट प्रकारच्या गोगलगायी आहेत. इंग्रजी भाषेत कवचधारी गोगलगायींना स्नेल तर बिनकवचाच्या गोगलगायींना स्लग म्हणतात. शरीरावर कवच असलेल्या गोगलगायी आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात आढळतात. एक-दोन गोगलगायी दिसल्यास त्या कौतुकाच्या विषय बनतात, परंतु समुद्रामध्ये आढळणार्‍या कोन स्नेल या गोगलगायी मानवाला उपयुक्त असल्याचे जर्मनतील एका संशोधनात आढळून आले आहे. --Read More

समुद्रामध्ये आढळणार्‍या कोन स्नेल ही गोगलगाय अतिशय धुर्तपणे शिकार करत असते. सुरूवातीला ती चिखलामध्ये लपून भक्ष्याची वाट पहाते. आपल्या शरीरावरील काटा हलवून भक्ष्याला किंवा माशांना आकर्षित करते. कुतुहलामुळे मासा जवळ आल्यास तो काटा वेगाने भक्ष्यावर मारला जातो. त्यात असलेल्या विषामुळे भक्ष्याला हालचाल करता येत नाही, अशा या गोगलगायीच्या विषापासून जर्मनीतील बोन्न विद्यापीठातील संशोधकांनी मानवाला उपयुक्त असे वेदनाशमक विकसित केले आहे. या वेदनाशमकचा शरीरावर कुठलाही साईड इफेक्ट होत नाही, कारण ते शरीरामध्ये लवकर विघटीत होते. कर्करोगासारख्या अत्यंत वेदनामय आजारामध्ये वेदनाशमकांवरील अवलंबित्व वाढण्याचा धोका असतो, तो गोगलगायीपासून निर्मीत वेदनाशमकामुळे राहणार नसल्याचे संशोधकांचे मत आहे.  कोन स्नेलच्या कोनोटॉक्सीन या नावाने ओळखले जाणार्‍या विषामध्ये मेंदूकडे पोचणार्‍या नसातील सिग्नलवर परीणाम करण्याची क्षमता असल्याचे संशोधकांना आढळले आहे. अत्यंत कमी प्रमाणात आणि अतिशय नियंत्रित स्वरूपात वापरून या विषाचा उपयोग योग्य त्या नसांसाठी करता येतो. त्यातून वेदना पोचवणार्‍या नसांवर त्याचा उपयोग करणे शक्य आहे. या विषामधील पेपटाईड आणि  अमिनोआम्ले यांच्या स्थिती लक्षात घेउन त्यापासून योग्य त्या प्रमाणात वेदनाशमक विकसित करण्याचे जर्मनीतील संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत.  

Vitamin D

जीवनसत्त्व ‘ड’ आणि आपले आरोग्य

सध्या अनेक जण शरीरावर ऊन कमीतकमी कसे पडेल याचा विचार करीत असतात. भर उन्हाळ्यात किंवा भरदुपारी उन्हापासून बचाव केलेला आपण समजू शकतो, परंतु हल्ली जरासुद्धा आपल्या शरीरावर ऊन पडू न देण्याचा कल अनेक लोकांमध्ये विशेषत: मुलीमध्ये दिसून येत आहे. परंतु असे केल्याने शरीराला लागणारे महत्त्वाचे ड जीवनसत्त्व मिळत नाही. हे जीवनसत्त्व जर शरीरात कमी झाले झाले तर शरीर अनेक आजारांना आणि विकारांना बळी पडू शकते. --Read More

‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते. तसेच हाडे दुबळी व मऊ बनतात.  अशा प्रकारचे दुष्परिणाम तर आपल्या ज्ञातच होते. परंतु ‘ड जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे ह्दयविकार, कॅन्सर, डायबिटीस सारखे रोगसुद्धा  बळावू शकतात. ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावामुळे मध्यमवयीन पुरूषांत ह्दयविकार आणि पक्षाघाताच्या झटक्याचा धोका वाढू शकतो, असा अमेरिकेतील संशोधकांनी एका संशोधनाआधारे निष्कर्ष काढला आहे. त्यांच्या निष्कर्षानुसार असा धोका उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्यांमध्ये सर्वात जास्त असतो.  ‘ड’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मेंदूतील रक्तप्रवाहाची गती थांबू शकते व त्यामुळे ह्दयविकाराचा झटका येऊ शकतो, असा निष्कर्ष हवाई युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सुद्धा काढला आहे.

                             खरंतर मानवी शरीराला रोज एक हजार युनिट ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.हे जीवनसत्त्व मिळविणे फार सोपे असते. राज अर्धा तास उन्हात उभे राहिल्यास शरीराला दहा हजार युनिट ‘ड’ जीवनसत्त्व मिळते. बाळास रोज सकाळच्या कोवळ्या उन्हात १५ मिनिटे ठेवल्यास  ‘ड’जीवनसत्त्वाची गरज भागते. त्यामुळे स्नायू, हाडे आणि दातांना बळकटी मिळते. केवळ कोवळ्या उन्हापासून  ‘ड’जीवनसत्त्व मिळते ,असे नव्हे. दूध, माशाचे तेल, अंडी, मांस इत्यादीमध्ये  ‘ड’जीवनसत्त्व भरपूर असते. अधिक वय झाले की शरीरामध्ये सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने ‘ड’जीवनसत्त्वाची निर्मीती करण्याची क्षमता मंदावते. अशावेळी आहारातून हे जीवनसत्त्व शरीरामध्ये जाईल, याची काळजी घेणे महत्त्वाचे असते. कोंबडीच्या खाद्यात बदल करून अंड्यातील ‘ड’ जीवनसत्त्वाचे प्रमाण नैेसर्गिकरित्या तीन ते पाच पट वाढविण्याचे प्रयत्न अनेक ठिकाणी यशस्वी झाले आहेत. अशा प्रकारचा ‘ड’ जीवनसत्त्वाचा नैसर्गिक शरीराला फारच उपयुक्त ठरतो.

Important Health Schemes

Pradhanmantri Jan Arogya Yojna, Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojna, --------- Read More

Gover

गोवर बनत आहे गंभीर आजार

गोवर हा मुख्यत: लहान मुलांमध्ये आढळणारा सांसर्गिक (विषाणूजन्य) आजार आहे. यात आधी सर्दी, खोकला, ताप आणि मग अंगावर पुरळ उठतात. निरोगी आणि धडधाकड मुलांना गोवरचा विशेष त्रास होत नाही. परंतु कुपोषणामुळे आपल्या देशात गोवराचे अनेक दुष्परिणाम होतात आणि मृत्युही होतात. म्हणूनच मुलांच्या महत्त्वाच्या ६ सांसर्गिक आजारांत गोवराचा समावेश केलेला आहे. हे आजार म्हणजे घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, पोलिओ आणि गोवर असे आहेत.--Read More

सुदैवाने भारतात गोवराविरूद्ध परिणामकारक प्रतिबंधक लस उपलब्ध आहेत. गोवरच्या लसींमुळे आता गोवरच्या साथी येणे कमी झाल्या आहेत. गोवरची लस शासकीय आरोग्यसेवेतून मोफत मिळते. एम.एम.आर. नावाच्या या लसीत गोवर, जर्मन गोवर आणि गालगुंड या तीन आजारांविरूद्ध लस एकत्र मिळते. गोवरप्रतिबंधक लस वापरून गोवर टाळणे हाच उत्तम उपाय या आजारावर आहे. कारण गोवरावर नेमके उपचार उपलब्ध नाहीत. रूग्णास आराम वाटावा आणि इतर जीवाणूंचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिजैविके देण्यात येतात.

   खरंतर सामान्य निरोगी सशक्त मुलास गोवर झाल्यास फार चिंता करण्याचे कारण नसते. परंतु हाच आजार अशक्त आणि कुपोषित मुलांमध्ये जीवघेणा ठरू शकतो. अशा मुलांमध्ये गावेरांनंतर न्यूमोनिया, कानामध्ये पाणी होणे, डोळ्यामध्ये संसर्ग, छातीत कफ, अतिसार, दबलेला क्षयरोग तसेच मेंदूज्वर असे आजार होऊ शकतात.  गरोदर महिलांना संसर्ग झाल्यास गर्भपात, दिवस भरण्यासाधी प्रसूती किंवा कमी वजनाचे मूल होणे असे प्रकार घडतात. 

   जगभरात जितके गोवरमुळे मृत्यू झालेत, त्यापैकी ४७ टक्के भारतात आणि ३६ टक्के आफ्रिकी देशांमध्ये झाल्याचे लॅन्सेट या आरोग्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे. असा साधारण समजला जाणारा हा आजार आता पुन्हा डोके वर काढू लागला आहे. कुपोषण, गरीबी, खाण्या-पिण्याबाबतचे अज्ञान आणि लसीकरणाबाबर उदासिनता या सर्व बाबी गोवरच्या मृत्यूंसाठी कारणीभूत आहेत. हा आजार पुन्हा मोठ्या स्वरूपात, लसीकरणाला सुद्धा प्रतिकारक बनण्याच्या अगोदर कूपोषण थांबविणे आणि लसीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, हेच ठोस उपाय समोर येत आहेत.

Colour Therapy

Colour Therapy

Colour Therapy

        कलर थेरपी      

रंगांचा व्यक्तीच्या मानसिकतेवर पडणारा परिणाम तपासून त्याद्वारे तिच्या स्वभावातील दोषांवर इलाज करण्याच्या थेरपीस कलर थेरपी असे म्हणतात. वेगवेगळ्या रंगाचा वापर करून व्यक्तीमत्व खुलवायचं काम ही थेरपी करते. ही थेरपी भारतात अगदी काही वर्षांपासून दाखल झाली आहे. त्यावर काही ठिकाणी गांभीर्याने संशोधन होत आहे. आता कलर थेरपीच्या माध्यमातून अनेक मानसिक आजारांचे निदान केले जात आहे. --Read More

विशिष्ट रंगाच्या वातावरणात कर्मचाऱ्याकडून अधिक चांगल्या प्रकारे काम करून घेता येते असा अनेक  कार्पोरेट कंपन्यांचा अनुभव आहे. रूग्णालयात सुद्धा रूग्णांना समाधान मिळावे, आनंद मिळावा म्हणून विशिष्ट रंगाचा प्रभाव पाडला जातो. कारागृहात सुद्धा कैंद्यांवर विशिष्ट रंगाचा प्रभाव पाडून त्याच्या गुन्हेगारीवृत्तीत काही चांगले बदल घडवून येतात का, यावरही कलर थेरपीद्वारे अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. 

             खरंतर कलर थेरपी ही प्राचीन कला आहे. तिचे महत्त्व आता आपल्या लक्षात आल्यामुळे त्याद्वारे विशिष्ट विकारांवर, रोगांवर उपचार केले जात आहेत. कलर थेरपीचे विशेषज्ञ विशिष्ट व्यक्तीचा अभ्यास करून त्याला कोणता रंग आवडतो हे सांगू शकतात. काही देशांमध्ये कर्मचाऱ्यावर कोणता रंग प्रभाव पाडू शकतो हे अभ्यासण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण यंत्राचे सहाय्य घेतले जाते. हे यंत्र त्या कर्मचाऱ्याच्या मानसिक आणि शारिरीक तपासणीनंतर सविस्तर अहवाल देते.

             कलर थेरपीमध्ये प्रामुख्याने दोन थेरपीजचा अवलंब केला जातो. त्यापैकी एका थेरपीमध्ये आयुर्वेदाचा आधार घेतला जातो. शरीरामध्ये वात, पित्त आणि कफप्रवृत्ती आढळते, या प्रवृत्तीशी संबंधीत आजारांचा शोध घेऊन रंगांच्या सहाय्याने शरीरातील असमतोल दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. या उपचारामध्ये वेगवेगळ्या रंगांचा वापर केला जातो. दुसऱ्या थेरपीमध्ये पंचमहाभूतांमुळे शरीराला उर्जा मिळते, त्यांचे शरीरातील संतुलन गमावल्यास विविध व्याधी जडतात. रंगांचा संबंध उर्जेशी असल्याने या थेरपीमध्ये  योग्य रंगांची निवड करून शरीरात उर्जा निर्माण केली जाते आणि गमावलेले संतुलन पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जातो.

             खरेतर कलर थेरपी अजिबात काम करत नाही, असे कुणीही म्हणू शकत नाही. बालपणापासूनच प्रत्येकाला कोणतातरी एक रंग आवडतो. त्या रंगाचे कपडे किंवा गाडी खरेदी करण्याकडेच त्यांचा कल असतो. आवडत्या रंगामुळे आत्मविश्‍वास वाढतो, असे प्रत्येकाने अनुभवले आहे. कलर थेरपी मध्ये सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे उपचार करतांना इतर थेरपीच्या तुलनेत गोळ्या, इंजेक्शन, सलाईन असे काहीही घ्यावे लागत नाही, त्यामुळे लहान मुले आणि सबंधित व्यक्ती ही थेरपी आनंदाने स्विकारतात, म्हणून कलर थेरपीची आवड दिवसेंदिवस लोकांमध्ये वाढत आहे. तसेच झाला तर फायदाच , नुकसान तर नाहीच, या भावनेपोटी का होईना, काहीजण प्रोयोगिक तत्त्वावर कलर थेरपीस मान्यता देत आहेत. सध्या ही थेरपी मोठ्या शहरांमध्ये उपयोगात आणली जात आहे, इतर ठिकाणी उपलब्ध होण्यास काही काळ वाट बघावी लागेल.

ऑस्टीओपोरोसीसवर सोपा उपाय

   भारतात ऑस्टीओपोरोसीस हा विकार आता ब ऱ्याच लोकांना ज्ञात झाला आहे. वेगाने बदलणारी जीवनशैली आणि असंतुलित खानपान यामुळे हा आजार झपाट्याने वाढत आहे. भारतात तर या विकाराच्या रूग्णांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.--Read More

या आजाराची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी दरवर्षी २० ऑक्टोबर हा दिवस विश्व ऑस्टीओपोरोसीस दिवस म्हणून गणला जातो. या विकारात हाडे  कमजोर होतात. हाडांमधील कॅल्शीयमचा स्तर हळूहळू कमी होण्यास सुरूवात होते. हाडांचे घनत्व कमी होते आणि थोड्याशाही धक्क्याने फ्रॅक्चर होऊ शकते. प्रत्येक तीन सेकंदाला ऑस्टीओपोरोसीसमुळे जगात एका व्यक्तीची कंबर मोडते. यावरून हा आजार किती गंभीर आहे, याची कल्पना येऊ शकते.

   ऑस्टीओपोरोसीसवर निरनिराळ्या थेरपीमध्ये अनेक प्रकारचे उपचार आहेत. या उपायांमध्ये आणखी एक सोपा उपाय सिद्ध झाला आहे. कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ टोरॉण्टो येथे झालेल्या एका संशोधनानूसार असे आढळले की ऑस्टीओपोरोसीसच्या विकाराने त्रस्त असलेल्या लोकांना दररोज दोन ग्लास टमाटरचा रस प्यायला दिला तर त्यांच्या शरीरात विशिष्ट बदल होवून हाडे मजबूत व्हायला सुरूवात होते. सविस्तर केलेल्या संशोधनानूसार टमाटरमधील लायकोपीन हा घटक या होकारात्मक बदलास कारणीभूत असल्याचे आढळून आले आहे. दोन ग्लास रसातून सुमारे १५ मिलीग्राम लायकोपीन उपलब्ध होते. आपल्या भागात टमाटर विपूल प्रमाणात आणि खिशाला परवडेल अशा किमतीत वर्षभर उपलब्ध असतात. तसेच केवळ ऑस्टीओपोरोसीसवर टमाटरचा रस गुणकारी नसून तो पुरूषांमधील प्रोस्टेट कॅन्सरवरही गुणाकारी असतो. तेव्हा लिंबू सरबत, कोकम सरबत यासोबत आता टमाटरचा रस प्यायला सूरूवात करा आणि ऑस्टीओपोरोसीसपासून मुक्ती मिळवा. 

Sujok Therapy

सुजोक थेरपी

अनेक प्रकारची औषधे, गोळ्या, उपचार, वैद्यकीय सल्ले यांना कंटाळून आता लोक सुजोक थेरपीकडे वळत आहेत. खरे तर सुजोक हा मुळचा कोरिअन शब्द असून त्याचा अर्थ आहे- हात आणि पाय. सुजोक थेरपी म्हणजे हाताच्या आणि पायाच्या पंजावर ऍक्युप्रेशरच्या माध्यमातून केली जाणारी उपचार पद्धती होय.--Read More

सुजोक थेरपीमध्ये हाताच्या आणि पायाच्या पंजातील पाच बोटांवरील बिंदूंचा हात, पाय, डोकं या अवयवांशी संंबंध जोडला आहे. तसेच माणसाच्या आहार-विहार, आचार-विचार या गोष्टींचा सुजोक थेरपीशी जवळचा संबंध आहे. खरंतर ही थेरपी समानतेच्या सिद्धांतावर आधारलेली आहे. समानतेच्या सिद्धांतात दोन समान गोष्टींचा काहीतरी संबध असतो, म्हणून त्या ऐमेकांसारख्या असतात, या तत्त्वाचा वापर करून हात आणि शरीर यांचा संबंध कसा लागतो, त्यांच्या ठराविक भागांच एकमेकांशी कसं साम्य असतं, त्यामुळे काही विशिष्ट बिंदूवर दाब दिल्यास त्याचा बदल कसा जाणवतो , याचे ज्ञान म्हणजे सुजोक होय. एखाद्या वस्तुवर दाब दिल्यास परिवर्तन घडतं, हेच ऍक्युप्रेशरचं मुलतत्त्व आहे. सुजोक थेरपीमध्ये हातातून ( पंजातून)  बाहेर येणार्‍या पाच बाटांचा शरीरातील पाच अवयवांशी ( दोन हात+दोन पाय+डोकं) संबंध जोडलेला असतो. या थेरपीत हाताच्या वा पायाच्या पंजावरील विशिष्ट बिंदूवर ऍक्युप्रेशर ट्रिटमेंट देऊन सांधेदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखीसारख्या विकारांवर उपचार करता येतो.

   या थेरपीचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे या थेरपीचे  शिक्षणआता सहज उपलब्ध झाले आहे. एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय किंवा फिजिकल विषयांच सखोल ज्ञाननसेल तरीही ती व्यक्ती सुजोक थेरपी शिकून स्वत:वर उपचार देखील करू शकते. आजच्या कार्पोरेट युगात अनेक कंपन्या स्टाफच्या फिटनेसविषयी आणि मानसिक स्वास्थाविषयी जागरूक असतात. त्यासाठी या कंपन्या व्यक्तीमत्त्व विकासाचे शिबीर, जीम, योगा असे उपक्रम अधिकृतरित्या राबवितांना आढळतात. आता या कंपन्या काहीतरी वेगळं करण्याच्या दृष्टीने आता सुजोक थेरपीचा पर्याय स्वीकारत आहेत.

तारूण्यात म्हातापण

   सध्या या स्पर्धेच्या युगात तरूणांना भेडसावणाऱ्या अनेक समस्यांपैकी एक समस्या तर आता सर्वांमध्ये आढळू लागली आहे. त्वचेवर सुरकुत्या पडणे, काळे चट्टे पडणे, मस किंवा चामखिळ येणे , डोळ्याभोवती सूज येणे किंवा काळी वर्तुळे दिसणे अशा अनेक समस्यांपैकी तरूणवयातच त्वचेवरील सुरकुत्यांची समस्या आता फार गंभीर बनत चालली आहे --Read More

पूर्वी त्चवेवरील सुरकुत्या या म्हातारवयातच दिसायला सुरूवात व्हायची, वाढत्या वयामुळे त्वचेवर अशा प्रकारे सुरकुत्या येणारच, त्यामुळे ही बाब या वयात फार गंभीर समजली जात नाही. परंतु आता या सुरकुत्यांच्या समस्येमुळे तरूण मुले-मुलीच तरूण दिसण्यासाठी प्रयत्न करतांनाचा विरोधाभास बघायला मिळत आहे.

   स्पर्धेचे युग असल्यामुळे कुणाकडेही स्वत:कडे लक्ष द्यायला वेळ नसतो. त्यामुळे वेळी-अवेळी भोजन, व्यायामाचा अभाव आणि वाढता ताण-तणाव ही सध्याच्या तरूणपिढीची ओळख झालेली आहे. नकारात्मक दृष्टीकोन ठेवून जगण्याच्या वृत्ती म्हणजे सुरकुत्यांना आमंत्रण देण्यासारखेच ठरत आहे. अन्नातील वाढती भेसळ, रासायनिक खते आणि किटकनाशकांचे अंश, हायब्रिड आणि जीएम तंत्रज्ञानाने विकसित केलेले अन्न हे तर त्वचेवरील सुरकुत्यांसाठी ङ्गारच महत्त्वाचे कारण समजले जात आहे. तसेच आनुवांशिकता आणि प्रदुषित वातावरण हे सुद्धा त्वचेवरील सुरकुत्यांवर परिणाम करतात. याशिवाय समतोल आहार न घेणे ही एक समस्याही अनेक वर्षांपासून दुर्लक्षित केली जात आहे. भोजन हे केवळ पोट भरण्यासाठी नसून शरीराला सर्वप्रकारची अन्नद्रव्ये पुरविण्यासाठी आहे, ही वस्तुस्थिती तरूणांना अजुनही समजलेली नाही. कॉर्पोरेट आणि मोठ्या कंपन्यांमधील अनेक तरूण -तरूणी फास्टफूड आणि कॅन्टीनचे अन्न खाण्यात मोठाईकी समजतात आणि तरूण दिसणाऱ्यावर मग नंतर पार्लरमध्ये हजारो रूपये खर्च करतात. त्यातून काही साध्य होत नाही. पावडर आणि क्रीम चेहऱ्यावर कितीही लावली तरी सुरकुत्यांचे जाळे फार काळ लपविले जाऊ शकत नाही. म्हणून अशा तरूण-तरूणपींनी सुरूकुत्यांमागील कारणे शोधून त्यावर योग्य असे उपचार सुरू करायला हवेत.

डान्स थेरपी

   संगीत ऐकल्यामुळे, हास्योपचारामुळे जसे मनावरील ताण कमी होतात त्याचप्रमाणे नियंत्रित स्वरपात नृत्य केल्यास ताण तणावांना मोकळे करता येते. शारीरिक आणि मानसिक आजार दूर करता येतात. नृत्याचा जेवढा जास्त आनंद घ्याल तेवढा जास्त फायदा होतांना दिसतो.कॉंटेम्पररी नृत्य प्रकारात नृत्य करतांना शरीराची आणि स्नायूंची विशिष्ट हालचाल केली जाते. यामुळे रूग्णांची कार्यक्षमता वाढते आणि रूग्ण बरे होऊ शकतात. --Read More

इतर अनेक आजार जसे कँसर, मानसिक रूग्ण, मधूमेह, स्पॉंडिलायटिस, स्थुलता, थॉयराईड, उच्च रक्त दाब अशा अजारांवर अनेक वर्ष औषधी घ्याव्या लागतात. अशा औषधोपचारांसोबत जर रूग्णाने डान्स थेरपीचा अवलंब केल्यास हे आजार लवकर बरे करण्यात किंवा नियंत्रित ठेवण्यात किंवा या आजारांच्या वेदना कमी करण्यात खूप उपयोग होतो. तसेच अपयशानंतर आलेले नैराश्य, ह्दयविकार, सांधेदुखी यांसारख्या अन्य आजारांवरही डान्स थेरपी एक प्रभावी उपचारपद्धती म्हणून पुढे येत आहे. काही व्यक्तींना जर वरील पैकी कोणताही आजार नसल्यास त्यांना डान्स थेरपीमुळे बुद्धी, शरीर आणि सौंदर्याचा विकास साधता येतो. 

   सध्या पुणे-मुंबईत कॉंटेम्पररी डान्स हा प्रकार उदयास आला आहे. शास्त्रीय नृत्याची मूलभूत तत्त्वे अंतर्भूत असलेला हा नृत्य प्रकार आहे.  कॉंटेम्पररी नृत्य प्रकारात नृत्य करतांना शरीराची आणि स्नायूंची विशिष्ट हालचाल केली जाते. यामुळे रूग्णांची कार्यक्षमता वाढते आणि रूग्ण बरे होऊ शकतात. अमेरिकेत हा नृत्य प्रकार गेल्या बारा वर्षापासून डान्स थेरपी म्हणून वापरला जातो, आपल्याकडे गेल्या एक वर्षापासून या प्रकाराबाबत चर्चा सुरू झाली आहे. पार्किन्सन्स हा आजार आता काही नवीन राहिलेले नाही, वयाच्या पन्नाशीनंतर हा आजार होऊ शकतो. अशावेळी रूग्णाच्या वयाचा विचार करून त्यास लयबद्ध हालचाली शिकविल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. स्वमग्नता म्हणजेपच आटिझमच्या रूग्णांवर देखील डान्स थेरपीने चाणगले परिणाम दाखविलेले आहेत.

   नृत्यामुळे मानवी शरीरातील मांसपेशी अधिक मजबूत होण्यास मदत होते. तसेच अतिरिक्त रक्तदाब आणि शरीरातील कोलेस्टेरॉलच्या पातळीमध्ये नृत्यामुळे आपसूक समतोल साधला जातो. या थेरपीचे वैशिष्ट्य म्हणजे यात गोळ्या-औषधे असे कशाचेही सेवन करावे लागत नाही, त्यामुळे साईड इफेक्टचा प्रश्‍नच येत नाही. सुरूवातीला प्रशिक्षित व्यक्तींकडून मार्गदर्शन घेतल्यास ही थेरपी घरी, बगिच्यात अशी कुठेही राबविता येते.

स्मृतीभ्रंश का व कसा?

डिमेन्शिया म्हणजेच स्मृतीभ्रंश हा विकार आता सर्वांना परिचित झाला आहे.२०३० पर्यंत ६६ दशलक्ष व्यक्ती या विकाराला बळी पडू शकतात, असा एक अंदाज आहे. शहरी भागात १० टक्के व ग्रामीण भागात ८ टक्के लोकांना हा विकार असल्याचे मानले जाते. --Read More

हा विकार होण्यामागे वाढते वय, उच्च रक्तदाब, मधुमेह, अयोग्य भोजन, व्यायामाचा अभाव, प्रत्येक गोष्टीची चिंता करण्याची सवय अशी अनेक कारणे आहेत. तसेच अल्झायमर, पार्किन्सन या विकाराच्या रूग्णांमध्येही स्मृतीभंश होऊ शकतो. वयाची साठी ओलांडल्यावर या विकाराची लक्षणे स्पष्टपणे जाणवण्यास सुरूवात होते. फीट्स येणे, व्यसन, अल्कोहोलची सवय, तसेच बी १२ जीवनसत्त्वाची कमतरता या गोष्टींमुळेही स्तृतिभ्रंश होऊ शकतो. 

   स्तृतीभ्रंशांमध्ये मेंदूला रक्तपुरवठा कमी झाल्याने कामाच्या दृष्टीने मेंदूचा भाग निकामी होतो. त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते. तसेच बौद्धिक क्षमता कमी होत असल्याने निर्णयक्षमताही कमी होते. परिस्थितीनुसार कसे वागायचे हे लक्षात न आल्याने गोंधळल्यासारखे होते. काही रूग्णांना २० वर्षापूर्वीच्या घटना स्पष्ट आठवतात, पण काही वेळापूर्वी केलेल्या गोष्टी आठवत नाहीत. विशेष म्हणजे स्वत:च्याच घरात गोंधळल्यासारखे होते. व्यक्तिमत्त्व हळूहळू बदलत जाते. शांत समजूतदार माणूस चिडचिडा होतो. एखाद्या एमआयआर, सीटीस्कॅनमुळे हा विकार समजू शकत नाही. रूग्णाच्या तपासण्या व मुलाखती घेऊन त्याचे निदान करावे लागते. सुमारे पाच- सहा वर्षे त्याची लक्षणे दिसतात आणि त्यानंतर हा विकार स्पष्टपणे ओळखता येतो.स्मृतीभ्रंश झालेल्या व्यक्तींनी योग्य उपचार वेळीच घेणे महत्त्वाचे असते.