Money

ऑनलाईन ई पॅन सुविधा सुरू

पॅन कार्डचे महत्त्व सर्वश्रूत आहे, २५ मे २०२० अखेर देशातील पॅनधारकांची एकूण संख्या ५०.५२ कोटी इतकी आहे. त्यापैकी व्यक्तिगत पॅनची संख्या ४९.३९ कोटी इतकी आहे. मात्र पॅन कार्ड तयार करण्यासाठी अर्ज भरणे, कागदपत्रे जोडणे आणि पॅन कार्डची वाट पहाणे अनेक लोकांना कटकटीचे वाटते. मात्र आता शासनाने यावर पर्याय काढला आहे. 

या नवीन पर्यायातर्ंगत ई पॅन कार्ड काढण्यासाठी आपला आधार क्रमांक आधारशी संलग्न मोबाईलला जोडलेला असणे आवश्यक आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे वैध आधार क्रमांक आणि आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक अशा लोकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. कोणताही अर्ज न भरता, कोणतीही कागदपत्र न जोडता अगदी विनामूल्य स्वरूपात ‘ई-पॅन’ विनाविलंब मिळविता येईल. अतिशय कमी वेळात म्हणजे फक्त १० मिनिटांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकणार आहे.

आधार तपशिलावर बेतलेल्या ऑनलाइन ‘पॅन’च्या (कायम खाते क्रमांक) त्वरित वितरणाच्या सुविधेला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सुरूवात केली आहे. पॅन वितरणाची प्रक्रिया सोपी करण्याच्या दिशेने अशा सुविधेची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. अर्थसंकल्पातील प्रस्तावानुरूप ई-पॅन सुविधा प्रयोगरूपात सुरू करण्यात आली आहे आणि त्या पश्चात आजवर ६,७७,६८० ई-पॅनचे वितरणही झाले आहे. सरकारने पॅन आणि आधार संलग्नताही सक्तीची केली असून, अनेकवेळा दिल्या गेलेल्या मुदतवाढीनंतर ३० जून २०२० ही त्यासाठी निर्धारीत केलेली अंतिम तारीख आहे. 

ठळक मुद्दे:-

* २५ मे २०२० अखेर देशातील पॅनधारकांची एकूण संख्या ५०.५२ कोटी इतकी आहे. त्यापैकी व्यक्तिगत पॅनची संख्या ४९.३९ कोटी इतकी आहे.

* आधारशी संलग्न असलेल्या पॅनची संख्या ३२.१७ कोटी इतकी आहे.

* आजवर ६,७७,६८० ई-पॅनचे वितरण.